Shruti.
Hello everyone. Shruti more is here .I will share my thought in blog
सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१
दहावी बारावी नंतर काय ?
बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१
एक अनुभव - बारावी | HSC 2021 experience | HSC result | Board exam cancel 2021 experience
एक अनुभव - बारावी | HSC 2021 experience | HSC result | Board exam cancel 2021 experience
महापूर - एक भयंकर वास्तव | पाऊस | महापूर 2021 | Kolhapur, sangali flood situation experience
महापूर - एक भयंकर वास्तव | पाऊस | महापूर 2021 | Kolhapur, sangali flood situation experience
वर्षातील तीन मुख्य ऋतू पैकी एक म्हणजे पावसाळा...🌧️
पाऊस म्हणल ना की आता आपल्याला आनंद, दुःख,भय हे शब्द नक्कीच आठवतील.
पाऊस पडायला हवा असं सगळ्यांनाच वाटत खास करुन आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांना पाण्याची म्हणजेच पावसाची खुप गरज असते, कारण पाण्याशिवाय पिक चांगलं येण शक्यच नाही.खूप कष्ट करून शेतकरी पेरणी करतात त्या नंतर त्यांना फक्त पावसाची ओढ असते.
पाऊस पडायला लागला की शेतकरी राजा सगळ्यात जास्त खुश होतो, तसेच दुष्काळी भागातील लोकांना पाऊस म्हणजे जणू स्वर्गच असे म्हणायला हरकत नाही.
ज्या लोकांना पाणी मिळत नाही त्यांच्या साठी पाऊस म्हणजे एक प्रकारे देणगीच आहे.
मग पाऊस पडायला लागल्यावर सर्वांना आनंद होणारच ना.
पण.....
याच पावसाने भयानक रुप धारण केल्यास...
काय होईल???
काय होईल हे आपण गेल्या काही दिवसांत अनुभवलं आहे.कित्येक ठिकाणी पाऊस इतक्या भयानक पद्धतीने कोसळला की माणसांची घरे पाण्याखाली गेली, इमारती ढासळल्या कित्येक माणसं मरण पावली.
शेतं बुडून पिके उध्वस्त झाली, त्याचबरोबर शेतीत हातभार लावणाऱ्या मुक्या जनावरांचा सुध्दा जीव गेला.काही जनावरांना लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलं.पण काही जनावरांना वाचवणं शक्य झालं नाही.
कित्येक प्राणी,पक्षी थंडीमुळे तसेच आसरा न मिळाल्याने तडफडून मेले.
या भयानक पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले , नदीपात्रातील पाणी वाढल्याने आसपासच्या परिसरात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली. खूप गावं पाण्याखाली गेली.जणू सगळीकडून दुःखाचा डोंगरच कोसळला.२-३ दिवसांतच या पावसानं सगळं उध्वस्त केलं.पूर आल्याने लाईट गेली, आजच्या काळात लाईट खुप महत्वाची आहे
२ तास लाईट नसली तर चालत नाही पण काही ठिकाणी २ दिवस लाईट नव्हती.लाइट नसल्यावर जेवण करणे वगैरे सगळेच अवघड होते, बाहेर भयानक पाऊस घरी लाईट नाही अशातच आणखी एक भर म्हणजे अचानक रात्री गॅससिलिंडर संपणे.चूल आणि स्टो नसल्यावर अशा प्रसंगी जेवण बनवायचे तरी कसे....?
अन्न,वस्त्र,निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत...पण आजकालच्या जगात मोबाईल ही सुद्धा एक मुलभूत गरज झाली आहे.लाईट नसल्याने मोबाईल स्विच ऑफ झाले होते, आणि मोबाईल सुरू असलातरी त्यामध्ये रेंज नव्हती.दोन दिवस का होईना पण मोबाईलला लोकांपासून सुटका मिळाली.विनामोबाईल लोकांची अवस्था मात्र वाईट झाली होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईट नसल्याने पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
हे असं सगळं गेल्या ३-४ दिवसांत झालं.
कोणी पाऊस आला म्हणून आनंदी झाले तर कोणी पाऊस जास्त झाला म्हणून दुःखी झाले आणि याच पावसाने जेव्हा भयानक रुप धारण केले तेव्हा सगळेच थक्क झाले.
हे एवढं सगळं झालं म्हणजे संकट संपल असं नाही...
पाऊसामुळे झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई करण्यासाठी खुप दिवस लागतील.
~श्रुती मोरे
२५.७.२०२१
दहावी बारावी नंतर काय ?
दहावी बारावी नंतर काय...?? दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागला, सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले, सगळे खूष ही झ...
-
दहावी बारावी नंतर काय...?? दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागला, सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले, सगळे खूष ही झ...
-
एक अनुभव - बारावी | HSC 2021 experience | HSC result | Board exam cancel 2021 experience या वर्षीच्या १२वी बद्दल ज...
